वाशीम - महापुरुषाच्या तैलचित्राची अकोला येथील मोठी उमरी भागात अज्ञात व्यक्तीकडून विटंबना प्रकरणी लहुजी शक्ती सेनेसह इतर समाज संघटनांच्या वतीने स्थानिक अकोला नाका चौकात बुधवारी शांततापुर्वक रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकरणाचा निषेध नोंदवून विटंबना करणार्या व्यक्तीला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद केले आहे की, अकोला शहरातील मोठी उमरी भागात प्रसिध्द असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात लावलेल्या महापुरुषांच्या तैलचित्रांची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. या विटबंनेचा तीव्र निषेध म्हणून सामाजीक संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन निषेध नोंदविला. यावेळी सामाजीक संघटनांच्या वतीने हातात फलक घेवून घोषणाबाजी केली. लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास थोरात, सामाजीक कार्यकर्ते रामेश्वर बाजड, रवि कांबळे, मोहनराज दुतोंडे आदींच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात लहुजी शक्ती सेना, मातंग युवा संघटन, विर लहुजी सामाजीक संघटना, रामभाऊ बाजड मित्रमंडळ, सुनिल दळवे, अनिल रणबावळे, दिपक साठे, गजानन वैरागडे, आकाश कांबळे, सुनिल कांबळे, महादेव आमटे, बंडु भालेराव, सुमित कांबळे, रवि खडसे, अंबादास जोगदंड, जनार्धन बांगर, महादेव खंदारे, सोपान खंदारे, उमेश गावंडे, हेमंत कांबळे, संतोष इंगळे, जगदीश मानवतकर, गजानन जाधव, शिवाजी कांबळे, दिपक लगड, गजानन कदम, संदीप बाजड, संजय तुपसौंदर, गणेश बाजड, सतिश गायकवाड, डिगांबर वैरागडे, शाम डोंगरे, किसन देवकते, योगेश रणशिंगे, बाबाराव सोनोने, सचिन घनघाव, मधुकर भोंगळ, शिवा पारसकर आदींसह जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने विविध समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
महापुरुषांच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी वाशीम येथे रास्ता रोको आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 16:03 IST
वाशीम - महापुरुषाच्या तैलचित्राची अकोला येथील मोठी उमरी भागात अज्ञात व्यक्तीकडून विटंबना प्रकरणी लहुजी शक्ती सेनेसह इतर समाज संघटनांच्या वतीने स्थानिक अकोला नाका चौकात बुधवारी शांततापुर्वक रास्ता रोको आंदोलन केले.
महापुरुषांच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी वाशीम येथे रास्ता रोको आंदोलन !
ठळक मुद्देअकोला शहरातील मोठी उमरी भागात प्रसिध्द असलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकात लावलेल्या महापुरुषांच्या तैलचित्रांची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली. या विटबंनेचा तीव्र निषेध म्हणून सामाजीक संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन निषेध नोंदविला. यावेळी सामाजीक संघटनांच्या वतीने हातात फलक घेवून घोषणाबाजी केली.