रिसोड येथे मुलभूत सुविधांचा अभाव

By Admin | Updated: June 25, 2014 01:39 IST2014-06-25T01:05:09+5:302014-06-25T01:39:52+5:30

रिसोड येथील प्रभाग क्रमांक एक भागात पालिका स्थापनेपासूनच मूलभूत सुविधाचा अभाव आहे.

Lack of basic amenities at Risod | रिसोड येथे मुलभूत सुविधांचा अभाव

रिसोड येथे मुलभूत सुविधांचा अभाव

रिसोड: रिसोड येथील प्रभाग क्रमांक एक भागात पालिका स्थापनेपासूनच मूलभूत सुविधाचा अभाव आहे. या भागात रस्ते, नाल्यासह मुख्य समस्या सांडपाण्याच्या विल्हेवाटाची आहे. दैनंदिन वापरातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याची व्यवस्थीतरित्या विल्हेवाट होत नसल्याने या परिसरातील नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने समस्या टप्प्याटप्याने मार्गी लावू, अशी ग्वाही दिली आहे.
रिसोड शहरातील प्रभागनिहाय समस्यांचा 'लोकमत'ने आढावा घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. नगर पालिकेचे सार्वजनिक शौचालय नसल्याने रात्रीच्यावेळी परिसरातीतच नागरिक शौचविधी उरकतात पावसाळय़ाच्या दिवसात हीच घाण नागरिकांच्या घरात वाहून येत असल्याच्या तक्रारी रहिवाशी नागरिकांनी केल्या आहेत. नगरपालिकेने आजपर्यंत यावर कुठलेही ठोस पाउल न उचलल्याने पालिका प्रशासनाविषयी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. त्याच प्रमाणे घनकचराव्यवस्थापनाचा अभाव आहे. काही भागात अतिक्रमणाचा अतिरेक झाल्याने पालिकेची घंटा गाडी, अथवा कचरा संकलनाकरीता जात असलेले ट्रॅक्टरसुद्धा काही भागात प्रवेश करु शकत नाही. पर्यायाने ही घाण याच परिसरात पडून राहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. या भागातील वाढलेले अतिक्रमण तातडीने काढून अत्यावश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी प्रभागातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे. प्रभगातील इतर परिसरातील भागात रस्ते, नाली, पाणीपुरवठा, पाईप लाईन, विजेचे खांब, ओपन स्पेसमधील सौंदर्यीकरण, पालिकेच्या विज पोलवरील लोंबकळत असलेल्या विजेचा तारा, विशिष्ट भागात पाण्याची होणारी नासाडी, फोफावत चाललेले अतिक्रमण, विना परवानगीने होणारी बांधकामे, रस्त्याच्या मधोमध रेती, विटा, गिट्टी, गज आदी बांधकाम साहित्याचे लागलेले ढीग हे नागरिकांसह वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत.

Web Title: Lack of basic amenities at Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.