पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर खाणेपिणे अन् झोपणे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:42 PM2020-10-21T12:42:26+5:302020-10-21T12:45:39+5:30

Labours From other state in Washim परराज्यातील शेकडो कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

Labours from other Eating and sleeping in the open in Washim District | पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर खाणेपिणे अन् झोपणे! 

पोटाची खळगी भरण्यासाठी उघड्यावर खाणेपिणे अन् झोपणे! 

Next
ठळक मुद्देमळणीयंत्रधारक पश्चिम विदर्भात कामगार घेऊन येतात.मोठ्या संख्येने कामगार येथे या हंगामात दाखल होतात.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय असल्याने पोटापाण्याला आधार मिळावा म्हणून परराज्यातील शेकडो कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तथापि, निवाऱ्यासाठी आधारच नसल्याने उघड्यावरच खाणेपिणे करून रात्री मिळेल त्या जागेत उघड्यावर झोप घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पश्चिम विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र लक्षणीय आहे. एकूण खरीप क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात सोयाबीनची पेरणी शेतकरी करतात. या पिकाच्या काढणीतून मजुरांना चांगला मोबदलाही मिळतो. याचा फायदा घेण्यासाठी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील काही मळणीयंत्रधारक पश्चिम विदर्भात कामगार घेऊन येतात. त्या राज्यातही रोजगाराची वाणवा असल्याने मोठ्या संख्येने कामगार येथे या हंगामात दाखल होतात. टीचभर पोटासाठी थोडा पैसाअडका जुळविण्याच्या धडपडीसाठी हे कामगार गावोगाव भटकंती करून सोयाबीनची काढणी करतात. तथापि, त्यांना निवाऱ्यासाठी कसलाही आधार नसतो. त्यामुळे भूक लागली की उघड्यावर स्वयंपाक करून जेवण करणे, तसेच रात्रीला एखादी मोकळी पडिक जमीन शोधून त्यावरच ते झोप घेत आपले काम करताहेत. शेकडो किलोमिटरचा प्रवास करून कुटुंबाच्या उदनिर्वाहासाठी भटकत असलेल्या या कामगारांना पुरेशा प्रमाणात मजुरीसुद्धा मिळत नसल्याने त्यांची पुरती वाताहत होत असल्याचेही या कामगारांकडून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.  
(प्रतिनिधी) 

Web Title: Labours from other Eating and sleeping in the open in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.