कुंभार समाजाचा एल्गार; वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ला देणार धरणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 15:03 IST2017-12-07T14:58:41+5:302017-12-07T15:03:02+5:30

मालेगाव (वाशिम): गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कुंभार समाजाने ‘एल्गार’ पुकारला असून येत्या १५ डिसेंबर रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

Kumbhar community agrisive mode; Washim District Collectorate Dharna agitation | कुंभार समाजाचा एल्गार; वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ला देणार धरणे!

कुंभार समाजाचा एल्गार; वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ला देणार धरणे!

ठळक मुद्देविविध प्रलंबित मागण्यांसाठी समाज संघटना झाली आक्रमक.जिल्हाभरातील समाजबांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

मालेगाव (वाशिम): गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कुंभार समाजाने ‘एल्गार’ पुकारला असून येत्या १५ डिसेंबर रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यात समाजबांधवांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळाआश्वासन देऊनही कुंभार समाजासाठी मातीकला बोर्ड अद्याप स्थापन झालेले नाही. याशिवाय इतरही अनेक मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. दरम्यान, झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी  सर्व समाजबांधवांनी धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आंदोलनासाठी योगेश मुंढरे, अरूण बनचरे, ललीत मुंढरे, रामा परडे, संतोष बनचरे, राहूल मुंढरे, पंकज चिल्होरकर, गणेश बनचरे, रवि मुंढरे, विजय गुजरे, बालु जोहरे, विक्रम मुंढरे, सदानंद बनचरे, अनिल बनचरे, दिनेश मुंढरे, योगेश मुंढरे, रमेश बनचरे, मोहन मुंढरे, पंकज मुंढरे, रवि मुंढरे, अजय बनचरे, राजू बनचरे, संतोष बनचरे, भगवान बनचरे, अशोक गुजरे आदी समाज बांधव प्रयत्न करित आहेत.

Web Title: Kumbhar community agrisive mode; Washim District Collectorate Dharna agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.