शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

आता बँकेतही शेतक-यांच्या सेवेत कोतवाल!

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

खरीप पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत कोतवालांची नेमणूक करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

वाशिम : पीक कर्जप्रकरणी बँकेत शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी प्रत्येक बँकेत कोतवालाची नेमणूक करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी खरीप पीक कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी अधिकार्‍यांना संबोधित करताना कोतवालाच्या नावाचा व भ्रमणध्वनी क्रमांकाचा फलक संबंधित बँकेच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सोमवारी ही बैठक घेण्यात आली.
यावेळी आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, वाशिमचे उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार बळवंत अरखराव, अमोल कुंभार, ए. पी. पाटील, सचिन पाटील, सोनाली मेटकरी, सुरुडकर, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, की राज्य शासनाने किमान ८0 टक्के शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पीक कर्ज पुनर्गठन व रुपांतरण करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यास सर्व बँकांनी प्राधान्य द्यावे. शेतकर्‍यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पैसे उपलब्ध होणे आवश्यक असल्याने जास्तीत जास्त शेतकर्‍यांना खरीप पीक कर्जाचे वाटप १५ जूनपूर्वी करण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत. पीक कर्ज मागणीसाठी प्राप्त झालेले अर्ज प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढावेत. तसेच पीक कर्जासंबंधी कागदपत्राबाबत कोणतीही समस्या असल्यास बँकेच्या अधिकार्‍यांनी तातडीने संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क साधून खातरजमा करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.