किशोर तिवारी यांनी घेतली वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियेची माहिती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:05 IST2018-03-28T15:05:49+5:302018-03-28T15:05:49+5:30

वाशिम :  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २७ मार्च रोजी सायंकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागाला भेट देत नेत्र शस्त्रक्रियेची माहिती घेतली.

Kishore Tiwari took eye surgery information from Washim District General Hospital | किशोर तिवारी यांनी घेतली वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियेची माहिती !

किशोर तिवारी यांनी घेतली वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रियेची माहिती !

ठळक मुद्देनेत्र शस्त्रक्रिया विभागात २७ मार्च २०१८ रोजी मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत ३८ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत एकूण ६५० शस्त्रक्रिया झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. दीड वर्षांपूर्वी नेत्र शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजी झाल्याने काही रूग्णांना आपले डोळे गमवावे लागले होते.

 

वाशिम :  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी २७ मार्च रोजी सायंकाळी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र शस्त्रक्रिया विभागाला भेट देत नेत्र शस्त्रक्रियेची माहिती घेतली. मागील अनुभव लक्षात घेता अधिक काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला यावेळी तिवारी यांनी दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ सुरेश चांडोळकर, डॉ. संदीप हेडाऊ, जगदीश बाहेकर आदी उपस्थित होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र शस्त्रक्रिया विभागात २७ मार्च २०१८ रोजी मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत ३८ नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच सन २०१७-१८ मध्ये आतापर्यंत एकूण ६५० शस्त्रक्रिया झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी तिवारी यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.  जिल्हा सामान्य रूग्णालयात गोरगरीब रुग्ण येत असून, या रुग्णांना अधिक चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध करून द्या, अशा सूचना तिवारी यांनी आरोग्य अधिकाºयांना केल्या. गतवेळची नेत्र शस्त्रक्रियेदरम्यानची निष्काळजीपणाची पुनरावृत्ती यापुढे होणार नाही, याची दक्षता घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. दीड वर्षांपूर्वी नेत्र शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजी झाल्याने काही रूग्णांना आपले डोळे गमवावे लागले होते. यावेळी तिवारी यांनी मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरात करण्यात झालेल्या शस्त्रक्रियांविषयी माहिती घेतली.

Web Title: Kishore Tiwari took eye surgery information from Washim District General Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.