कारच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: October 30, 2014 00:20 IST2014-10-30T00:01:10+5:302014-10-30T00:20:12+5:30
औरंगाबाद ते नागपूर द्रूतगती मार्गावरील कुकसा फाट्याजवळ अपघात.

कारच्या धडकेत एक ठार
शिरपूरजैन (वाशिम): औरंगाबाद ते नागपूर द्रूतगती मार्गावरील कुकसा फाट्याजवळ होण्डा सिटी कारच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना २८ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान घडली.
घटनेतील मृतकाचे नाव दिलीप गुणाजी पांडे आहे. शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या कुकसा फाट्यानजीक होण्डा सिटी कार क्रमांक एमएच २0 सीएस ६५0 ने औरंगाबादकडून येत असताना दुचाकी क्रमांक एमएच २८ एएफ २२0९ या दुचाकीला पाठीमागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरून प्रवास करणारे दिलीप गुणाजी पांडे हे घटनास्थळीच ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेले दिलीप सुर्वे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी कारचालक संजय भाऊराव धाईत रा. औरंगाबाद याच्याविरूद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. चालकास अटक करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के.के. खंडारे व त्यांचे सहकारी करीत आहेत.