शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामांतील गैरप्रकाराचे ‘खोदकाम’!

By admin | Updated: May 13, 2017 05:01 IST

तपासणीसाठी पथक गठित : पथकाची ‘आॅन दि स्पॉट’ पाहणी.

संतोष वानखडे वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांतील गैरप्रकाराचे ह्यखोदकामह्ण जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केले आहे. एका विशेष पथकाने रिसोड तालुक्यातील ४२ कामांना दिलेल्या भेटीत कामांतील अनियमिततेवर शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहीर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबुतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे यासह विकासात्मक कामे जॉबकार्डधारक मजूरांकडून केली जातात. जिल्ह्यातील सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी तसेच सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी दीड वर्षांपासून सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंधन टाकले आहे. अतिशय तातडीचे काम असेल तर वरिष्ठांच्या पूर्वसंमतीशिवाय त्या कामाला सुरुवात करू नये, अशी अट टाकण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्देशांना पायदळी तुडवित काही ठिकाणी सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने विशेष पथक गठित केले असून, या पथकामार्फत ह्यआॅन दि स्पॉटह्ण तपासणी सुरू केले आहे. गत तीन दिवसांपासून रिसोड तालुक्यातील जवळपास ४२ कामांची पाहणी या पथकाने केल्याची विश्वसनीय माहिती आहे. आगरवाडी, देगाव, केनवड, मोठेगाव, मांडवा, शेलू, नंधाना, पेनबोरी, करडा, कोयाळी, लेहणी, गोवर्धन, चिंचाबा भर, हराळ, घोटा यासह एकूण ४२ कामांना भेटी देण्यात आल्या. भेटीदरम्यान एकूण ४६ कामे सुरू असल्याचे निदर्शनात आले तसेच वरिष्ठांची पूर्वसंमती न घेता नव्याने १६ कामांना सुरुवात झाल्याचेही समोर आले. काही कामांवर मजूर उपस्थित नसल्याचे आढळून आले तर काही कामे जुनीच असल्याचा गंभीर प्रकारही उघडकीस आल्याची माहिती आहे. लोकसहभागातून केलेल्या एका कामाला रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामात दाखविण्याचा प्रतापही करण्यात आल्याचे पाहणीदरम्यान उपस्थित लोकांनी सांगितले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही कामांवर हजेरीपत्रक नसल्याचे आढळून आले. ४२ कामांना भेटी दिल्याचा व आढळलेल्या गंभीर बाबींचा अहवाल या विशेष पथकाने गुरुवार व शुक्रवारी पंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालावर आता मुख्य कार्यकारी अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या आॅन दि स्पॉट तपासणीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सर्वांचेच धाबे दणाणलेरोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामांची ह्यआॅन दि स्पॉटह्ण तपासणी सुरू केल्याने कंत्राटदारांसह संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांची पूर्वसंमती न घेता काही ठिकाणी नव्याने कामे सुरू असल्याचेही या तपासणीत समोर आल्याने, रोहयोच्या माध्यमातून लाखो रुपयांचे पाणी मुरविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पांदण रस्त्यांची कामे बंद असतानाही, सदर कामे सुरू केल्याची बाब तपासणीतून समोर आली.रोजगार हमी योजनेंतर्गतच्या कामातील गैरप्रकार दूर करण्याच्या दृष्टिकोनातून व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाभरात ही मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.बीडीओंचा प्रभार आता शृंगारेंकडे !रोजगार हमी योजनेंतर्गतच्या वादग्रस्त कामांवरून प्रकाशझोतात आलेल्या रिसोड पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा प्रभार मकासरे यांच्याकडून काढून घेत बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांच्याकडे सोपविला होता. मात्र, मध्येच ह्यराजकारणह्ण आडवे आल्याने रुजू होण्यापूर्वीच नायक यांचा प्रभार काढून सहायक गटविकास अधिकारी मोहन शृंगारे यांच्याकडे शुक्रवारी सोपविला.