शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

संत झोलेबाबा यात्रा महोत्सवनिमित्त चिखली येथे खंजेरी भजन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 2:11 PM

शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम) : चिखली येथे संत झोलेबाबा यांच्या ५४ व्या यात्रा महोत्सव निमित्त २२ जानेवारीपासून भव्य खंजेरी भजन स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भजनी मंडळांसाठी १ लाख १० हजार रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार असून, यात जास्तीत जास्त मंडळीनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.   मागील ५१ वर्षांपासून चिखली येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित खंजेरी भजन स्पर्धा आयोजीत करण्याची परंपरा आहे. यंदा २२ जानेवारीपासून ही स्पर्धा होणार आहे. यात २२ जानेवारी रोजी प्रौढ विभाग, २३ जानेवारीला बाल विभाग व २४ जानेवारी महिला खंजेरी भजन स्पर्धा होणार आहे. प्रौढ विभागासाठी प्रथम बक्षीस ११,१११ रुपये, व्दितीय ९१११ रुपये, तृतीय ७१११ रुपये, चौथे बक्षीस ४१११ रुपये अशी १४ बक्षिसे देण्यात येणार आहे. बाल विभागात प्रथम बक्षीस ७००१ रुपये, दुसरे ५००१ रुपये, तिसरे बक्षिस ४००१ रुपये, चौथे बक्षिस २५०१ रुपये अशी ८ मंडळांना बक्षिसे दिली जाणार आहे, तर महिला भजनी मंडळांसाठी प्रथम बक्षिस ९००१ रुपये, दुसरे ७००१ रुपये, तिसरे ५००१ रुपये, चौथे ४००१ रुपये, पाचवे ३००१ रुपये अशी १० बक्षिसे ठेवण्यात आली आहे.   या स्पर्धेत जास्तीत जास्त खंजेरी भजन मंडळानी सहभागी व्हावे असे आवाहन खंजेरी भजन स्पर्धा उत्सव समितीचे अध्यक्ष वसंतराव सुर्वे व व्यवस्थापक सुधाकर भांडेकर यांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिकIndian Traditionsभारतीय परंपरा