कोरोनात आई गमावलेल्या मुलीच्या नावे कारखेडा ग्रामपंचायतने जमा केली कायम ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:41 AM2021-07-31T04:41:55+5:302021-07-31T04:41:55+5:30

मानोरा : कोरोनाकाळात आईचे छत्र हरवलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीच्या नावे कारखेडा ग्रामपंचायतने १८ वर्षांपर्यंत दहा हजार रुपये कायम ...

Karkheda Gram Panchayat has deposited the name of the girl who lost her mother in Korona | कोरोनात आई गमावलेल्या मुलीच्या नावे कारखेडा ग्रामपंचायतने जमा केली कायम ठेव

कोरोनात आई गमावलेल्या मुलीच्या नावे कारखेडा ग्रामपंचायतने जमा केली कायम ठेव

Next

मानोरा : कोरोनाकाळात आईचे छत्र हरवलेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीच्या नावे कारखेडा ग्रामपंचायतने १८ वर्षांपर्यंत दहा हजार रुपये कायम ठेव ३० जुलै रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन याच्या हस्ते धनादेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शण्मुगराजन, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार संदेश किर्दक यांची उपस्थितीत होती. कोरोना काळाच्या महामारीत सहा वर्षीय मुलगी स्वाती विशाल ढोले या चिमुकलीचे आईचे छत्र हरवल्यामुळे गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी सामाजिक बांधीलकी दाखवत तिच्या उद्याच्या भविष्यासाठी वयाच्या १८ वर्षांपर्यंत सुकन्या योजनेद्वारे दहा हजार रुपये कायम ठेव जमा केली. या अभिनव उपक्रमाची सुरुवात स्वतः जिल्हाधिकारी यांनी धनादेश देऊन केली. कारखेडा ग्रामपंचायतने कोविड प्रतिबंधक समितीच्या सहकार्याने ४५ वर्षांवरील नागरिकाचे ९७ टक्के लसीकरण व १८ वर्षांवरील नागरिकाचे ८१ टक्के लसीकरण केलेले आहे, याचे गमक जिल्हाधिकारी यांनी या धनादेश वाटप कार्यक्रमात कोविड प्रतिबंधक समिती व गावातील नागरिकांना विचारले व लसीकरणाच्या कामगिरीविषयी आनंद व्यक्त केला. इतर ग्रामपंचायतने या गावचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. गावाच्या कोविड प्रतिबंधक समितीचा सन्मानपत्र, पुषगुच्छ देऊन सन्मान केला. तत्पूर्वी गावाच्या जि. प. शाळेची यशोगाथा राज्यस्तरावर निवडण्यात आल्याने शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, सहायक शिक्षक रणजित जाधव, कविता चौधरी याचा गौरव करण्यात आला. गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके, उपसरपंच अनिल काजळे,ग्रामसेवक अनिल सूर्य, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य वर्षा मोहनराव देशमुख, प्रमिला राजू चव्हाण, चैताली विवेक परांडे, मंडल अधिकारी एस. बी. जाधव, तलाठी सागर चौधरी, पोहरादेवचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर यांची उपस्थितीत होती.

Web Title: Karkheda Gram Panchayat has deposited the name of the girl who lost her mother in Korona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.