गणेश विसर्जनासाठी कारंजात नगर परिषद, पोलीस प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:44 IST2021-09-18T04:44:33+5:302021-09-18T04:44:33+5:30
कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या देखरेखीखाली शहरातील सार्वजनिक व घरगुती विसर्जनासाठी ...

गणेश विसर्जनासाठी कारंजात नगर परिषद, पोलीस प्रशासन सज्ज
कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक विनय वानखडे यांच्या देखरेखीखाली शहरातील सार्वजनिक व घरगुती विसर्जनासाठी नगर परिषद प्रशासनाकडून ११ ट्रॅक्टरची सजावट करून भक्तांच्या सेवेत राहणार आहे. १ टॅक्टर राखीव तसेच नगर परिषद कर्मचारी पथक कार्यान्वित राहणार आहे. सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी फक्त गणेश मूर्तीसोबत ३ ते ४ भक्तांना परवानगी राहणार आहे. या सोबत पोलीस प्रशासन सज्ज राहणार आहे. यामध्ये एस.आर.पी.एफ चे २ पथक व एक कमांडो पथक व बाहेरील ४ अधिकारी व लोकलचे ९ पोलीस अधिकारी व ८० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी राहणार आहे.
बाॅक्स : नगर परिषदेच्या ट्रॅक्टरमध्ये गणेश मंडळांनी मूर्ती ठेवावी
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी नगर परिषद विभागाने सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये आपली गणेश मूर्ती विसर्जनासाठी ठेवावी, असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी केले आहे. तसेच ज्या ठिकाणी गणेश स्थापना आहे. त्या ठिकाणाहून विसर्जनाचे जवळचे ठिकाण ग्राह्य धरून विसर्जन करावे.
-----
कोट : कोरोना काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता सर्वांनी गर्दी करू नये तसेच मास्कचा उपयोग करावा. घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी नगर परिषद प्रशासन सज्ज असून त्यांच्याकडे आपण गणेश मूर्ती द्यावी. आम्ही विधिपूर्वक गणेश विसर्जन करू.
-दादाराव डोल्हारकर,
मुख्याधिकारी, नगर परिषद, कारंजा