शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा : घराचे कुलूप तोडून ३.२५ लाखांचे दागिने लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:31 IST

कारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देपोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली.दत्ता विश्वनाथ ताथोड यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की २७ जानेवारी रोजी ते कुटूंबासह गावी गेलेले होते. २८ जानेवारीला सकाळी ते कारंजातील त्यांच्या निवासस्थानी परत आले असता, घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळले. घरात जावून पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. घरात ठेवलेले २ मंगळसूत्र, १ गोप, ३ कानातील दागिणे असा एकंदरित १३० ग्रॅम सोन्याचा ऐवज (अंदाजे किंमत ३ लाख २५ हजार रूपये) लंपास झाल्याचे निदर्शनास आले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध कलम ४५७, ३५७ भादंविअन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथक व  ठसे तज्ज्ञास घटनास्थळी पाचारण केले होते. सदर घटनेचा पुढील तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी यादव, ठाणेदार एम. एम. बोडखे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पायघन करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrimeगुन्हाThiefचोर