शिरूर अनंतपाळात भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून ३ लाख ३७ हजारचा ऐवज केला लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 07:09 PM2017-12-09T19:09:56+5:302017-12-09T19:10:20+5:30

शिरूर अनंतपाळ  येथील भोजराजनगर भागातील राज्यमार्गालगत असलेल्या दत्ता देवशटवार यांच्या घराचे कुलूप तोडून भर दिवसा धाडसी चोरी करण्यात आली.  यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागीने तसेच रोख ३२ हजार असा ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला.

Shiroor Anantha, Bhabardi brave burglary; Locked out of the lock 3 lakh 37 thousand rupees | शिरूर अनंतपाळात भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून ३ लाख ३७ हजारचा ऐवज केला लंपास

शिरूर अनंतपाळात भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून ३ लाख ३७ हजारचा ऐवज केला लंपास

googlenewsNext

लातूर : शिरूर अनंतपाळ  येथील भोजराजनगर भागातील राज्यमार्गालगत असलेल्या दत्ता देवशटवार यांच्या घराचे कुलूप तोडून भर दिवसा धाडसी चोरी करण्यात आली.  यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात असलेले सोन्याचे दागीने तसेच रोख ३२ हजार असा ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला.

शिरूर अनंतपाळ येथील किराणा मालाचे व्यापारी दत्ता देवशटवार हे शनिवारी आपल्या आईला उपचारासाठी लातूर येथील दवाखान्यात गेले होते . तर कुटुंबातील इतर सदस्य लग्न समारंभा निमित्त घराला कुलूप लावुन बाहेर गेले होते. हीच संधी साधत चोरट्यानी घरात घुसून दाराचे कुलूप तोडले आणि बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील सोन्याचे दागीने किमंत ३ लाख ५ हजार २०० रूपये तसेच रोख ३२ हजार असा एकंदर ३ लाख ३७ हजार २०० रूपयाचा ऐवज लंपास केला. 

याबाबत दत्ता देवशटवार यांचा मुलगा दिनेश देवशटवार यानी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . गुरन १९२ / २०१७ कलम ३८० ,४५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन ,अधिक तपास पोउपनि प्रदिप आलापुरकर करीत आहेत .दरम्यान घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक पोनि सुधाकर जगताप यानी भेट देऊन घटनेची पाहणी केली आहे .

श्वान पथकास पाचारण 
दरम्यान घटनेचा तात्काळ सुगावा लागावा यासाठी लातूर येथील श्वान पथकास बोलाविण्यात आले होते. परंतु श्वान घराच्या परिसरात घुटमळला आंणि गाडीत जाऊन बसला त्यामुळे चोरटे कोणत्या दिशेने गेले ते समजु शकले नाही .त्यामुळे दिवसा ढवळ्या घटना घडली असल्याने शहरासह तालुक्यात घबराहट पसरली आहे . 

ठसे घेण्यात आले 
श्वान पथकाकडून चोरट्याची दिशा निश्चितपणे समजली नसल्याने ठसा तज्ञाना बोलावुन कुलूप कोंडी तसेच घरातील ठसे घेण्यात आले आहेत .एकंदरच सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे

Web Title: Shiroor Anantha, Bhabardi brave burglary; Locked out of the lock 3 lakh 37 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर