कारंजा : शिक्षक व नगर परिषद कर्मचाऱ्याकडे आढळल्या दारुच्या बाटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 18:20 IST2020-05-05T18:20:22+5:302020-05-05T18:20:37+5:30
शिक्षक व नगर परिषद कर्मचाºयाकडे दारूच्या बॉटल आढळून आल्याची घटना ४ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली .

कारंजा : शिक्षक व नगर परिषद कर्मचाऱ्याकडे आढळल्या दारुच्या बाटल्या
कारंजा : कोरोना संसगार्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने सावरकर चौक कारंजा येथे चेक पोस्ट लावण्यात आले. या ठिकाणी कार्यरत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षक व नगर परिषद कर्मचाºयाकडे दारूच्या बॉटल आढळून आल्याची घटना ४ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली . या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी एक शिक्षक व एका कर्मचाºयाविरूद्ध गुन्हा दाखल केला.
कारंजा शहरालगत असलेल्या अकोला रोडवरील सावरकर चौकात चेक पोस्ट लावण्यात आली. त्यावर ३ माजी सैनिक व जिल्हा परिषद शिक्षक रामेश्वर भानुदास सावके, नगर परिषद कर्मचारी सुनील मडामे हे ४ मे रोजी सावरकर चौकात कर्तव्य करीत असताना दुचाकी गाडी क्रमांक एम .एच. ३७- ५२५४ च्या डिक्कीत व्हीस्की १८० एमएलच्या ८ बॉटल व इतर दारुच्या ३ बाटल असा एकूण १५४० रुपयांची दारू व गाडी किंमत ८० हजार रुपये व शिक्षक सावके यांच्याकडून ३ हजार रुपयांचा माल असा एकूण ८४५४० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. ही दारू रामेश्वर सावके यांचा मंगरूळपीर रोडवर असलेल्या राजधानी बियरबार मधून नगर सेवक राजू इंगोले यांना देण्यासाठी सुनील मडामे याच्या माध्यमातून आल्याची माहिती शिक्षक सावके यांनी दिली. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाने हे दोन कर्मचारी कर्तव्य बजावत असताना नियम बाह्य काम केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी ४ मे रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान त्यांच्याविरुध्द कलम १८८, २६९, ६५ अ गुन्हा दाखल केला.