मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी कारंजाचे कानकिरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST2021-03-04T05:19:26+5:302021-03-04T05:19:26+5:30

अकोला येथील बँकेच्या कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ मार्च रोजी नवनिर्वाचित संचालकांची सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी संतोषकुमार कोरपे, तर ...

Kankird of Karanja as the Vice President of the Central Bank | मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी कारंजाचे कानकिरड

मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी कारंजाचे कानकिरड

अकोला येथील बँकेच्या कार्यालयात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी ३ मार्च रोजी नवनिर्वाचित संचालकांची सभा पार पडली. अध्यक्षपदासाठी संतोषकुमार कोरपे, तर उपाध्यक्षपदासाठी श्रीधर पाटील कानकिरड या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवडणुक बिनविरोध झाली. अध्याशी अधिकारी म्हणून विनायक कहाडेकर यांनी काम पाहिले. जिल्हा बँकेवर कोरपे गटाचे एकतर्फी वर्चस्व असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपद कोरपे गटाकडेच राहणार, हे ठरलेले होते. कानकिरड यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याने कारंजा तालुक्याला दुसऱ्यांदा हा मान मिळाला आहे. यापुर्वी सन २००१ मध्ये स्व. दिलीप देशमुख यांना उपाध्यक्षपद मिळाले होते. माजी आमदार तथा कारंजा बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके यांच्या गटातून श्रीधर पाटील कानकिरड यांनी दुसऱ्यांदा संचालक पदासाठी निवडणूक लढविली होती आणि त्यात ते यशस्वी झाले.

Web Title: Kankird of Karanja as the Vice President of the Central Bank