बसस्थानक परिसरात काळीपिवळीचा ‘गजर’

By Admin | Updated: June 28, 2014 23:44 IST2014-06-28T23:00:32+5:302014-06-28T23:44:23+5:30

अगदी बसस्थानकाच्या जवळच काळ्यापिवळ्या उभ्या राहत आहेत.

Kalypi's 'alarm' in bus station area | बसस्थानक परिसरात काळीपिवळीचा ‘गजर’

बसस्थानक परिसरात काळीपिवळीचा ‘गजर’

कारंजा लाड : बसस्थानकाच्या २00 मीटर परिसरात खासगी प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनांची पार्र्किंग करता येत नाही. मात्र, अगदी बसस्थानकाच्या जवळच काळ्यापिवळ्या उभ्या राहत आहेत. खासगी प्रवासी वाहनांची वाहतूक करणारे बसस्थानक परिसरात उभे राहून प्रवासी मिळवण्यासाठी ह्यगजरह्ण करतात.
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी काळीपिवळी, लक्झरी, अँपे यांना परवाना दिला जातो. पण, पोलिसांशी विचार ह्यविनिमयह्ण करून खासगी प्रवासी वाहतुकदार आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक करीत आहेत. परिणामी कारंजा परिसरात अनेक अपघात घडत आहेत. लक्झरी बसचे चालक आणि क्लिनर यांनी थेट एसटीचे प्रवासी पळवण्याचा जणू विटा उचलला आहे, अशा अविर्भावात ते प्रवाशांना हाळी देत आहेत. बसस्थानकाच्या बाहेर खासगी प्रवाशी वाहनाने रस्त्यावर जागा मिळेल तिथे उभी केली जात आहेत. त्यामुळे राहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. खासगी प्रवाशी वाहनांच्या पार्किंगसाठी नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. पण, त्यामुळे काहीच वाहने उभी राहतात. अमरावतीकडे जाणार्‍या लक्झरी बस तर नेहमीच रस्त्याच्या कडेने उभ्या असतात. या शिवाय बायपास परिसरातील झाँशी राणी चौकाचा परिसरही ह्यनो पार्र्किं ग झोनह्ण आहे. मात्र, या ठिकाणी जड वाहणे २४ तास उभी असलेली दिसतात. येथून यवतमाळ, अमरावती, मानोरा, वाशिमकडे रस्ता जातो. त्यामुळे वाहनांची मोठय़ा संख्येने वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या मधोमध केल्या जाणार्‍या वाहनांच्या पार्र्किंगमुळे अपघात होऊ शकतो. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन कायद्याचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Kalypi's 'alarm' in bus station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.