कारंजा उपविभागातील कबड्डी संघ जिल्हास्तरावर
By Admin | Updated: September 19, 2014 23:49 IST2014-09-19T23:48:29+5:302014-09-19T23:49:10+5:30
हॉकी संघ विभागावर

कारंजा उपविभागातील कबड्डी संघ जिल्हास्तरावर
कारंजालाड : कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील विविध शाळेमधील कबड्डी संघाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी ह्यभरारीह्ण घेतली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिमच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत कारंजा येथील प्र.ग.गावंडे विद्यालयातील १४ व १७ वर्षाआतील मुलांच्या कबड्डी संघाची जिल्हा स्तरावर निवड झाली आहे. १४ वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या संघात रूपेश तायडे, सनी भोयर, सुशील जीचकार, शिवा राऊत, आशिष कोकाटे, तेजस तिलगाम, विशाल गायकवाड, अभिजीत भड तर १७ वर्ष वयोगटाच्या संघात प्रफुल पुणेवार, सागर गवारे, अभय राऊत, राहुल खंडारे, मंगेश घोरपडे, आकाश जाधव, गोपाल ढगे, सुजित शामसुंदर सलामे यांचा सहभाग राहणार आहे.
१७ वर्षाआतील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अंतिम सामना पार्वतीबाई कन्या विद्यालय विरूद्ध वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा चेहेलमध्ये होवून यामध्ये आश्रमशाळा चेहेलचा संघ विजयी झाला. मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय व महिला कनिष्ठ महाविद्यालयाच्या १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या कबड्डी संघाची जिल्हा स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे.
** हॉकी संघ विभागावर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम द्वारा जिल्हास्तरीय शालेय हॉकी व नेहरू हॉकी स्पर्धा वाशिम येथील क्रीडा संकुल येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलांच्या हॉकी स्पर्धेत वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा चेहेलचा संघ विजयी झाला. या संघात कर्णधार अर्जुन चव्हाण, ह्यगोलकिपरह्ण अक्षय राठोड, ऋषिकेश राठोड, सचिन जाधव, सचिन पवार, प्रदीप चव्हाण, आकाश भगत, धनराज डापसे, अंकित इंगोले, विष्णू राठोड, सुनील भगत, प्रदिप सोनोने, अतुल पवार, विकास पवार, श्रावण राठोड, अमोल डापसे, अनिल पडघान, महेश चव्हाण सहभागी होते. २0 सप्टेंबरला होणार्या क्रीडा संकुल अमरावती येथे विभागीय हॉकी स्पर्धेत सदर आश्रमशाळा हॉकी संघ सहभागी होणार आहे.