जीवन प्राधिकरणची ३६ कोटी रुपयांची थकबाकी
By Admin | Updated: May 14, 2014 00:28 IST2014-05-13T23:59:13+5:302014-05-14T00:28:34+5:30
पाणीपुरवठा योजनांसाठी पुरविलेल्या पाण्याच्या पाणीपट्टीसह योजनांच्या उभारणीसाठी दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या रकमेची थकबाकी अद्यापही वसूल होणे बाकी आहे.

जीवन प्राधिकरणची ३६ कोटी रुपयांची थकबाकी
वाशिम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत अकोला व वाशिम जिल्हा परिषदांसह नगर परिषदांना पाणीपुरवठा योजनांसाठी पुरविलेल्या पाण्याच्या पाणीपट्टीसह पाणीपुरवठा योजनांच्या उभारणीसाठी आयुर्विमा महामंडळ हुडको यांनी दिलेल्या कर्जाच्या व व्याजाच्या रकमेची ३६ कोटी २८ लाख ८ हजार रुपयांच्या रकमेची थकबाकी अद्यापही वसूल होणे बाकी आहे. अकोला जिल्हा परिषदेकडे असलेली थकबाकी १९८६-८७ सालापासून वसूल झालेली नाही हे विशेष.