शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संथारा बंदीविरुद्ध जैन समाज एकवटला!

By admin | Updated: August 25, 2015 02:31 IST

शांततेत मूक मोर्चा काढून नोंदविला निषेध; जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रशासनाला दिले निवेदन.

वाशिम : सल्लेखना/संथारा (समाधी मरण) व्रत परंपरेला राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातली. यामुळे जैनधर्मियांच्या भावना दुखावल्या असून, न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा, या मागणीसाठी जिल्ह्यात सर्वत्र सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकल जैन समाजबांधवांनी मूक मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या संथारा प्रथा बंदीच्या निकालाविरुध्द सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी काढण्यात आलेला मूक मोर्चा उत्स्फूर्त ठरला. यावेळी वाशिम तालुक्यातील सकल जैन समाज बांधव, महिला भगीनी व युवतींनी मोर्चात हजेरी लावली. संपूर्ण दिवसभर सकल जैन समाजाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. मोहमायेचा त्याग करुन दिक्षा घेतल्यानंतर जैन धर्माचे आचार्य, मुनीगण, संत, साधू, साध्वी आपल्या आत्मसाधनेत रममान्य होवून जीवनाच्या अंतिम क्षणात नश्‍वर शरीराचासुध्दा स्वेच्छेने त्याग करुन समाधी मरण अंगीकारतात. म्हणजे यालाच संथारा, सल्लेखना, समाधी मरण म्हणतात. हा प्रकार आत्महत्येत मोडत नाही; तर आत्मसाधनेत मोडतो. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा, संलेखना व समाधी मरणाला आत्महत्येचे स्वरुप देवून तसा निकाल दिला. यामुळे सकल जैन समाजाच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे. याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतात २४ ऑगस्टला प्रत्येक तालुका व जिल्हाठिकाणी मुकमोर्चाचे आयोजन करुन जिल्हाधिकारी व संबंधीतांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना सुध्दा निवेदने पाठविण्यात आली. सकल जैन समाजाच्या वतीने रमेशचंद बज, विनोद गडेकर, प्रविण पाटणी, केशरचंद सावके, ङ्म्रेणीक भुरे, अनिल वाल्ले, प्रविण पाटणी, मनिष संचेती, शिखरचंद बागरेचा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, सकाळी १0 वाजता नगर परिषद चौकस्थित महावीर भवन येथून मुकमोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुरुष मंडळींनी पांढरा पोषाख, महिलांनी केशरी रंगाची साडी व विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करुन मोर्चात सहभाग नोंदविला. हा मोर्चा रमेश टॉकीज, सुभाष चौक, काटीवेश, बालुचौक, शिवाजीचौक, रविवार बाजार, पाटणी चौक, आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन चौक, बसस्थानक, तहसील कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, राजस्थान महाविद्यालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ठाणेदार रवींद्र देशमुख व त्यांच्या सहकार्‍यांनी मोर्चादरम्यान चोख बंदोबस्त ठेवला.