एसटीबसचे ‘लोकेशन’ घरबसल्या पाहण्याचा मुहूर्त लांबला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST2021-08-23T04:43:26+5:302021-08-23T04:43:26+5:30

.............................. बस कुठे आहे ते आधीच कळणार व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर एसटीचे लोकेशन मोबाईलवरही देण्यात येणार ...

It's too late to see the 'location' of STBs at home! | एसटीबसचे ‘लोकेशन’ घरबसल्या पाहण्याचा मुहूर्त लांबला !

एसटीबसचे ‘लोकेशन’ घरबसल्या पाहण्याचा मुहूर्त लांबला !

..............................

बस कुठे आहे ते आधीच कळणार

व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर एसटीचे लोकेशन मोबाईलवरही देण्यात येणार आहे. या सुविधेची माहिती ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या ‘व्हीटीएस’ प्रणालीची घोषणा केली होती.

................

१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला

‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम’ हे ॲप १५ऑगस्टलाच सर्व एसटी बसमध्ये लाँच होणार होते; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली.

जिल्ह्यातील कारंजा आगारांतर्गत धावणाऱ्या काही बसचे लोकेशन मिळत आहे; परंतु त्यात अधूनमधून अडचणी निर्माण होत असल्याचे तेथील आगारप्रमुखांनी सांगितले.

..............

सर्वच बसमध्ये यंत्रणा कार्यान्वित

वाशिम ४९ ४९

कारंजा ३८ ३७

मंगरूळपीर ३५ ३५

रिसोड ३४ ३४

...................

कोट :

वाशिम येथील आगारांतर्गत ४९ एसटी बस सध्या विविध मार्गांवर धावतात. त्या सर्व बसमध्ये ‘लोकेशन’ची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे; मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती अद्यापपर्यंत कार्यान्वित झालेली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत हा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.

- विनोद इलामे

आगारप्रमुख, एसटी डेपो, वाशिम

Web Title: It's too late to see the 'location' of STBs at home!