शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कवितेतून वास्तव मांडणे गरजेचे - महेंद्र ताजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 2:36 PM

आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मानवी जीवनमुल्यांचे सर्जक नक्षत्रं कवितेतून उगवतात. परंतु काही कविंनी उठबस कविता बनविणे सुरु केल्याने कविता नकोसे म्हणणारे अनेक जण आहेत. यामुळेच कवितेचा वाचक मर्यादित झालेला आहे. यासह तत्सम विषयांवर आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

कविता उदंडपणे लिहिली जातेय, कवितेच्या दर्जाबद्दल काय सांगाल?मुलत: कविता लिहिणे ही अतिशय गंभीर प्रक्रीया आहे आणि असते. भोवतीच्या जळत्या अरण्यात जगण्याचे अनेक जळते प्रश्न निराधर झाले आहेत. कवितेच्या माध्यमातून हा जटिल गुंता सोडविता येऊ शकते. कवितेचं अविष्करण उदंड पातळीवर होत असलं आणि तिच्या दर्जेच्या संदर्भात काही प्रश्न उपस्थित होत असले तरी आज लिहिली जाणारी कविता मला खूपच आश्वासक वाटते. आशय आणि रचनाबंधनेच्या पातळीवर विविधांगाने ती फुलत आहे. कवितेचा गाभा अथवा तिची मुल्यरचना अधिक सर्जनशिल होताना दिसते.

कवितेला बांधीलकी असू शकते का?कवी आणि कविची भूमिका या वेगळया दोन भूमिका असू शकत नाहीत. कविला कवितेतून वेगळं बाजुला काढता येत नाही. कविता हिच कविची भूमिका असते आणि कवी असणे ही सुध्दा एक भूमिकाच असते. भूमिकाविहिन कविता ही समुद्रात भरकटलेल्या नावेसारखी असते. दिशाहिनता जीवनाला विध्वंसक विवराकडे घेऊन जाते. दिशादर्शी कविता मानवी जीवनाला परिपूर्णत्वाकडे घेऊन जाते.

तुम्ही तुमच्या कविताकडे कसे बघता?मी कविता लिहितो म्हणजे माझ्या जखमी आयुष्याच्या तडफडीची जळती लिपी मी उदघोषित करीत असतो. व्यवस्थेने दिलेल्या सलत्या जखमा मला कविता लिहायला भाग पाडतात.

तुमच्या पुस्तकांना कोणते पुरस्कार मिळाले?पुरस्कार मिळण्यापेक्षा वाचकांच्या जया चांगल्या प्रतिक्रीया येतात तोच साहित्यीक, कवींसाठी उत्कृष्ट पुरस्कार असतो. तरी सुध्दा माझ्या ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ संग्रहाला हिंगोली वाचनालयाच्या ‘मनोहर स्मृती पुरस्कार’ आणि ‘ग्लोबल महासत्तेचा इस्फोट’ या कविता संग्रहाला अमरावतीचा सुदाम सावरकर राज्यस्तरिय पुरस्कारा मिळाला आहे. यासह जिल्हास्तरावरील अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.. मानवी जीवनाचा सर्वांगिण आशय कवितेतून उगविला तर कविता वाचाविसी वाटते. कविता म्हणजे काय तर आपल्याला जे आवडते ते इतरांनाही आवडावे अशी कलाकृती म्हणजे कविता होय. मग ती कोणत्याही विषयावर असून शकते. प्रेम कवी खूप आहेत वास्तव मांडणारे कवी हवे आहेत.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत