अंगणवाडी केंद्रांतील अनियमितता चव्हाट्यावर !
By Admin | Updated: April 7, 2017 15:08 IST2017-04-07T15:08:18+5:302017-04-07T15:08:18+5:30
रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली.

अंगणवाडी केंद्रांतील अनियमितता चव्हाट्यावर !
वाशिम - बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी रिसोड तालु्क्यातील अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी दिल्या असता, अनियमितता चव्हाट्यावर आली.
रिसोड तालुक्यातील किनखेड, मसलापेन, शेलगाव राजगुरे, गोवर्धन येथील पाच अंगणवाडी केंद्रांना अचानक भेटी देण्यात आल्या. तपासणीदरम्यान बरीच अनियमितता आढळून आली. शेलगाव, मसलापेन क्रमांक १ व २ आणि गोवर्धन येथील क्रमांक तीनच्या अंगणवाडी सेविका गैरहजर आढळल्या. तसेच पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिला बचत गटाकडून सुद्धा आहार नियमित देत नसल्याचे निदर्शनास आले. गैरहजर सेविकांना व रेकॉर्ड बरोबर नसलेल्या सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांचे कामकाज सुरळीत चालावे याकरिता यापुढेही अचानक भेटी देऊन कामचुकार सेविकांवर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई केली जाईल, असे बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक यांनी सांगितले. तपासणी पथकात मदन नायक यांच्यासह पर्यवेक्षिका मेश्राम व झळके यांचा समावेश होता.