जिल्हावासियांना अनियमित वीज पुरवठयाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:58 IST2017-10-30T13:57:11+5:302017-10-30T13:58:34+5:30

जिल्हावासियांना अनियमित वीज पुरवठयाचा फटका
वाशिम : जिल्हयात भारनियमन सुरु नसल्याचे एकीकडे सांगण्यात येते परंतु तास न तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांसह लघुव्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
जिल्हयात दररोज दिवसातून दोन ते तीन तास विद्युत पुरवठाखंडित होत आहे. यामुळे लघुव्यावसायिकांचे नुकसान होत असून शेतकºयांनाही अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात होत असलेल्या खंडित विद्युत पुरवठयामुळे तर ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर संपूर्ण गाव अंधारात जात आहे. रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जाणे टाळतोय व दिवसा विद्युत पुरवठा नसल्याने शेतकºयांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रात्रीच्यावेळी अभ्यास करताना विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नुकसानाची संभावना आहे. वीज पुरवठा नियमित व सुरळीत ठेवावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.