शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या सणाचे मतदारांना निमंत्रण

By admin | Updated: October 7, 2014 01:15 IST

वाशिम जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी राबवला जाणार अनोखा उपक्रम.

वाशिम : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सण. हा सण दसरा, दिवाळी, ईद सारख्या पारंपारिक सणासोबत जोडून आला आहे. त्यामुळे या सणाच्या वातावरणामध्ये मतदारांना मतदानास येण्याचे आवाहन करणारे निमंत्रण प्रत्येक मतदाराला पाठवण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा निवडणूक यंत्रणा राबवणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली. जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले मतदार हा निवडणुकीतील सर्वात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा गेल्या २ महिन्यां पासून कार्यरत आहे. नवीन मतदार नोंदणी पासून ते आज घडीला मतदान केंद्रांची माहिती प्रत्येक म तदारापयर्ंत पोहचवण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने नियोजनबध्द कार्यक्रम राबविला आहे आणि यापुढेही तो राबवला जाणार आहे. मतदार जागृती करत असताना प्रत्येक मतदार संघातील भौगोलिक परिस्थिती व या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर झालेले मतदान याची माहि ती समोर ठेवून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या मतदान केंद्रावर कमी म तदान नोंदवले गेले त्या केंद्राच्या परिसरात अधिक प्रभावीपणे मतदार जागृती मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणाबरोबरच स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, रेशन दुकानदार, महिला बचत गट यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे. हे सर्व घटक मतदान जागृतीमध्ये प्रामाणिकपणे योगदान देत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपयर्ंत पोहोचणे शक्य होणार आहे.