स्वयंमुल्यमापनाला १७ मे चा मुहूर्त
By Admin | Updated: May 14, 2014 00:28 IST2014-05-13T23:40:15+5:302014-05-14T00:28:51+5:30
गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या हेतूने राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या स्वयंमुल्यमापणाला १७ मे चा मुहरूत गवसला आहे.

स्वयंमुल्यमापनाला १७ मे चा मुहूर्त
वाशिम : गावातील तंटे गावातच मिटविण्याच्या हेतूने राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेच्या स्वयंमुल्यमापणाला १७ मे चा मुहरूत गवसला आहे. सदर मोहीमेत सहभागी झालेल्या गावांनी १७ मे रोजी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये गाव तंटामुक्त झाल्याचे घोषीत केलेली गावे जिल्हा अंतर्गत व बाह्य मुल्यमापनासाठी पात्र ठरतील अशी माहीती पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे मोहीमेच्या अंमलबजावणीला ब्रेक लागला होते. गावातील तंटे गावातच मिटविण्याचा महत्वाकांक्षी दृष्ट्रीकोन ठेवून राज्य शासनाने सन २00७ पासून राज्यभरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी उत्कृष्ठ कामगिरी करणार्या गावांना लाखमोलाचे पुरस्कार देण्याचे धोरणही शासनाने अंगीकारले आहे. याचे फलित म्हणून आजमितीला प्रत्येक जिल्ह्यात हजारो तंटे गावपातळीवरच समोपचाराने मिटले आहेत. यंदा मात्र ही महत्वकांक्षी मोहीम आचारसंहितेच्या फेर्यात अडकली होती. २0१३-१४ मध्ये राज्यातील हजारो गावांनी ही मोहीम प्रभावीपणे राबविली असली तरी, त्यांचे मुल्यामापण करणार्या समित्या आचारसंहितेमुळे गठित होऊ शकल्या नव्हत्या . दरवर्षी १५ एप्रिल पूर्वी सदर मूल्यमापन समित्या गठित होऊन ३0 एप्रिलपूर्वी यांचे प्रशिक्षण व मूल्यमापनासाठी गाव वाटप केले जाते. ५ मे पुर्वी तंटामुक्तीच्या स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यमापन केले जाते. १६ मे रोजी आचारसंहिता संपणार आहे. त्यामुळे १७ मे रोजी या मोहीमेत सहभागी झालेल्या गावांनी ग्रामसभा घैऊन गाव तंटामुक्त घोषीत करावे व तसा अहवाल १८ मे पर्यंत ठाणेदार व तहसिलदार यांना सादर करावा असे आदेश पोलीस विभागाने जारी केले आहेत.