आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा 

By संतोष वानखडे | Updated: January 10, 2024 18:02 IST2024-01-10T18:01:35+5:302024-01-10T18:02:10+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या होत्या.

Instructions to complete tasks prior to code of conduct; Vashim Zilla Parishad Construction Department review meeting | आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा 

आचारसंहितेपुर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश; जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा 

वाशीम : जिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी ‍किरण कोवे यांनी बांधकाम विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेऊन निवडणूक आचार संहितेपूर्वी विभागांतर्गत जास्तीत जास्त कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हा  परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात याबाबत बुधवारी (दि. १०) आढावा सभेत ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, बांधकाम ‍विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुसकर, लेखाधिकारी सु. ब. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनीही याबाबत संबंधित यंत्रणेला सुचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी ‍किरण गणेश कोवे यांनी बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या, अडचणींबाबतही त्यांच्याशी संवाद साधला. कोणत्याही कामाला विलंब न लावता नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बांधकाम विभागांतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देऊन मार्चपुर्वी ‍निधी खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: Instructions to complete tasks prior to code of conduct; Vashim Zilla Parishad Construction Department review meeting

टॅग्स :washimवाशिम