शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:30 PM

वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संसदेच्या लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार एकूण आठ मुद्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभागाला ११ एप्रिल रोजी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संसदेच्या लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार एकूण आठ मुद्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभागाला ११ एप्रिल रोजी दिले आहेत. या निर्देशाच्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये पारदर्शकता राहावी, याकरीता संसदेच्या लोकलेखा समितीने काही शिफारशी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार अन्नधान्याची निर्धारीत केलेली किंमत, त्याचे प्रमाणाबाबत माहिती असलेला फलक प्रत्येक रेशन दुकानांमध्ये प्रदर्शित करण्याच्या सूचना लोकलेखा समितीच्या अहवालात दिलेल्या आहेत. त्यानुसार लाभार्थींनाा वितरित करण्यात येणाºया अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मुल्य, अन्नधान्याची पात्रता, रेशन दुकाने उघडणे व बंद करण्याची वेळ, भोजनाची वेळ तसेच अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण आदींबाबत काही तक्रारी असल्यास त्या कोणत्या अधिकाºयांकडे कराव्यात, त्याचबरोबरच तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक आदींची माहिती असणारा फलक रेशन दुकानांमध्ये सर्वांना सहज दिसेल, अशा ठिकाणी लावण्यात यावा, असे लोकलेखा समितीच्या अहवालात नमूद आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये उपरोक्त मुद्यांच्या अनुषंगाने सूचना फलक लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने पुरवठा विभागाला दिले आहेत. सदर सूचना फलक सर्व रेशन दुकानदारांनी लावले आहेत का? याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी व नियंत्रकांनी करावी आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करावा, असेही अन्न, नागरी पुरवठा विभागाने बजावले आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिम