जिल्हा कचेरीत थर्मल गनव्दारे तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST2021-01-08T06:12:44+5:302021-01-08T06:12:44+5:30
.............. कूपनलिका घेण्याबाबत निर्बंध लादण्याची मागणी वाशिम : शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या जात आहेत. त्यावर प्रशासनाचे ...

जिल्हा कचेरीत थर्मल गनव्दारे तपासणी
..............
कूपनलिका घेण्याबाबत निर्बंध लादण्याची मागणी
वाशिम : शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कूपनलिका खोदल्या जात आहेत. त्यावर प्रशासनाचे कुठलेही निर्बंध राहिलेले नाहीत. परिणामी, जमिनीतून पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असून कूपनलिका घेण्याबाबत निर्बंध लादावेत, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी गुरुवारी केली.
.........................
तूर कापणीचे दर दुपटीने वाढले
मालेगाव : गतवर्षी प्रती तिफण १२०० रुपये असलेले तूर कापणीचे दर यावर्षी मात्र दुपटीने वाढले आहेत. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी आणखीनच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे शेतीकामासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे.
....................
गतवर्षातील ३३ खुनाच्या घटनांचा छडा
वाशिम : २०२० या वर्षात खुनाच्या तब्बल ३३ घटना घडल्या होत्या. त्या सर्व प्रकरणांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांनी दिली.