समृद्धी महामार्गाच्या मदतीने निर्माण केलेल्या शेततळ्यांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST2021-02-06T05:16:48+5:302021-02-06T05:16:48+5:30
शेततळी योग्यप्रकारे खोदली का? त्यामध्ये पाणीसाठा किती आहे? त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला? याचा अगदी सविस्तर आढावा शैलेश हिंगे ...

समृद्धी महामार्गाच्या मदतीने निर्माण केलेल्या शेततळ्यांची पाहणी
शेततळी योग्यप्रकारे खोदली का? त्यामध्ये पाणीसाठा किती आहे? त्याचा किती शेतकऱ्यांना फायदा झाला? याचा अगदी सविस्तर आढावा शैलेश हिंगे यांनी घेतला. या कामाची पाहणी करण्याकरिता समृद्धी महामार्गाचे अधिकारी ओस्वाल, देव तसेच मंगरूळपीर येथील जलमित्र सचिन कुलकर्णी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या मदतीने तयार झालेल्या या शेततळ्यात प्रचंड पाणीसाठा निर्माण झाला. या पाणीसाठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना संरक्षित जलसिंचन करणे तसेच पिकाचे क्षेत्र वाढविणे या दोन्हींसाठी झाला. शिवाय या जलसाठ्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली. गावकऱ्यांसोबत केलेल्या चर्चेतून शेतकऱ्यांनी स्वतःहून सांगितले की, त्यांच्या विहिरींना आज भरपूर पाणी आहे? आणि त्यामुळेच ते आज रबीचे पीक घेऊ शकत आहेत. यामध्ये यावर्षी समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गाव जानोरी येथील शेतकऱ्यांनी स्वतःचा अनुभव सांगताना गावात रबीचे क्षेत्र वाढले, विहिरींची पाण्याची पातळी वाढली, बोअरवेलला भरपूर पाणी आहे. ग्राम आखतवाडा येथेसुद्धा शेततळे झाले. त्यामुळे येथील आसपासच्या विहिरींची पाणीपातळी वाढली, दोनद बु. येथे आज तळ्यामध्ये पाणी नसले तरी त्यामध्ये पावसाळ्यात जे पाणी साठले होते ते सर्वच्या सर्व जमिनीमध्ये मुरल्या गेले. त्यामुळे आज गावातील सर्व विहिरींची पाणीपातळी खूप वर आहे. दोनदमधील शेततळ्याची पाहणी केल्यानंतर उपस्थित गावकरी व महिलांशी संवाद साधला.