मानसिक रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी संस्थेचा पुढाकार

By Admin | Updated: June 22, 2014 01:25 IST2014-06-22T01:23:18+5:302014-06-22T01:25:14+5:30

राजरत्न संस्थेचा उपक्रम :वाशिम उपजिल्हाधिकार्‍यांनी केली प्रशंसा.

Initiatives of Sewa Bhavi for rehabilitation of mental patients | मानसिक रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी संस्थेचा पुढाकार

मानसिक रूग्णांच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी संस्थेचा पुढाकार

वाशिम: मानसिक रूग्णांचे पुर्नवसनाचा समाजसेवी उपक्रम एकांबा येथील राजरत्न संस्थेने उपक्रम हाती घेतला आहे.रस्त्यावर दिसणार्‍या मानसिक रूग्णांना नविन कपडे , त्यांना खाण्यासाठी पदार्थासह त्यांची विचारपूस या संस्थेतर्फे केली जात असून त्यांचे पुर्नवसन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. या उपक्रमाची माहिती कळल्याने निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
ह्यदगडात देव शोधल्यापेक्षा दीन-दु:खितांना मायेचा हात दयाह्ण अशी शिकवण देणोर थोर संत गाडगोबाबा यांनी मानव सेवेचे व्रत घेतले होते. माणसाच्या दु:खी अवस्थेत मदत करणे हा मानवधर्म असून इतर कुठलाही धर्म यापेक्षा मोठा नाही असे प्रतिपादन कीर्तनातून केले होते.तसेच ते कृतीतून दाखवून दिले होते .
हे धोरण पुढे ठेवून वाशिम शहरातील रस्त्यावर फिरणार्‍या मनोरुग्णांच्या पुर्नवसनाबाबत एकांबा येथील राजरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.सदर संस्थच्या पदाधिकार्‍यांनी हे कार्य सुरु करण्यापुर्वी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचा सल्ंला घेतला होता.त्यांनी संस्था पदाधिकार्‍यांना मनोरुग्णांच्या पुनर्वसनाविषयी माहिती देऊन संस्थेस नेहमी सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी संस्थेस पाचशे रुपये दानसुध्दा ताबडतोब दिले.या दानातून व जवळचे पैसे खचरून संस्था पदाधिकार्‍यांनी कपडे विकत घेवून रस्त्यावरील फिरणार्‍या मानसिक रूग्णांना दिल.तसेच त्यांना अन्नदान सुरु केले.ज्यांना कुणाचाच आधार नाही अशा मानसिक रुग्णांच्या पुनर्ववसनासाठी संस्था प्रयत्न करीत असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.संस्थेच्या या कार्यात बसस्थानकातील बसचालक डी.डी. चव्हाण,वाळके, एस.पी. कांबळे, दत्ता खेमणे, पी. पी. इंगळे, उलेमाले, धोत्रे, जाधव, शेख, जमील, जाधव यांचे सहकार्य लाभले.
या कार्यासाठी संस्थेचे विनोद पट्टेबहादूर युवा सामाजिक कार्यकते भगवान ढोले, गजेंद्र राऊत, गजानन गोटे, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, अमोल देशपांडे, सिने अभिनेता अरविंद उचीत, सिनेअभिनेत्री हंसीनी उचीत यांच्यासह अनेकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title: Initiatives of Sewa Bhavi for rehabilitation of mental patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.