महागाई : खाद्यतेल, गॅस, पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST2021-03-19T04:40:56+5:302021-03-19T04:40:56+5:30
सध्या भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आव्याक्यात दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढत असल्याने ...

महागाई : खाद्यतेल, गॅस, पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
सध्या भाजीपाल्याचे दर सामान्यांच्या आव्याक्यात दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढत असल्याने सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये भर म्हणून खाद्यतेल, डाळीचे भाव वधारल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गॅस ८५० रुपये तर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. अशा स्थितीत असंघटित कामगार, मंजूर यांच्यावर उपासमार आली आहे. त्यात मार्च अखेर असल्याने महावितरण कंपनीकडून वीज बिल भरण्याचा तगादा लावल्या जात आहे, त्यातही वातावरण चांगले नसल्याने ग्रामीण भागातील ५० टक्के लोक आजारी आहेत. दवाखाना करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. महागाईच्या काळात गरीब माणसाला आर्थिक आधाराची गरज आहे.
..................
शेतीच्या मशागतीवर परिणाम...
डिझेलचे दर वाढल्याने शेतातील उन्हाळी मशागतीच्या कामासाठी नांगरणीच्या कामात यंदा दीड पट वाढ झाली आहे. मागील वर्षी नांगरणीचा दर एकरी ८०० रुपये होता. यंदा डिझेल महाग असल्याने १,३०० रुपये आहे. यामुळे शेतीच्या मशागतीचे बजेट वाढले आहे. परिणामी शेतकरी त्रस्त झाला आहे.