अनसिंगमध्ये संसर्गजन्य आजार बळावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:42+5:302021-09-27T04:45:42+5:30
अनसिंग : अनसिंग येथे गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, चिकुनगुनिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण बळावले आहे. स्थानिक प्रशासनाचे ...

अनसिंगमध्ये संसर्गजन्य आजार बळावले
अनसिंग : अनसिंग येथे गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, चिकुनगुनिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण बळावले आहे. स्थानिक प्रशासनाचे स्वच्छतेकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे अडचणीत अधिकच भर पडली असून नागरिक हैराण झाले आहेत.
अनसिंगच्या वाॅर्ड क्रमांक दोनमध्ये अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्याची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे घरांमधून बाहेर निघणारे घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. रस्त्यांची दुरवस्था होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विठ्ठल रुख्माई मंदिरानजिक लढ्ढा यांच्या घरासमोर मोठमोठे खड्डे असून त्यात पावसाचे पाणी साचून राहत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नाली नसल्याने सांडपाणी मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. या सर्व प्रतिकूल बाबी संसर्गजन्य आजार बळावण्यास कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
.............
कोट :
ग्रामसेवक मधुकर बोडखे हे वाशिमवरून अपडाऊन करतात. त्यांचे अनसिंगमधील समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकले जात नसल्याने साथरोग बळावण्यास ही बाब कारणीभूत ठरत आहे. कितान आरोग्य विभागाने अलर्ट राहून साथरोग नियंत्रणासाठी प्रयत्न करायला हवे.
- प्रकाश राऊत, अनसिंग