Industry in Washim MIDC in danger due to lack of water | मुबलक पाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग संकटात
मुबलक पाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग संकटात

प्रस्ताव अडकला लालफितशाहीत : लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: येथील एमआयडीसीमध्ये रस्ते, विद्यूतची सोय झाली असली तरी सर्वांत मोठी असलेली पाण्याची समस्या मात्र अद्याप सुटली नाही. परिणामी, मोठे उद्योजक याठिकाणी उद्योग उभारण्यास तयार नाहीत. दरम्यान, नजिकच्या एकबूर्जी प्रकल्पावरून पाण्याची गरज भागविणे शक्य आहे; परंतु त्यासाठी प्रथम एकबूर्जी प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार असून लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचा सूर उद्योजकांमधून उमटत आहे.
वाशिम हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. असे असले तरी एकमेव पाटणी चौकाचा अपवाद वगळता शहरात कुठेही अद्यापपर्यंत मोठी बाजारपेठ उभी झालेली नाही. लघुव्यवसायांच्या माध्यमातून काही सुशिक्षित युवकांनी बेरोजगारीवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, त्याचे प्रमाणही सिमित आहे. दुसरीकडे २१५ हेक्टर क्षेत्रावर वसेल्या येथील ‘एमआयडीसी’मधील ९७ भुखंडांपैकी केवळ ७ ते ८ भुखंडांवरच उद्योग सुरू झाले आहेत.
तथापि, उद्योगांची संख्या वाढल्यास शहरातील अनेक बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळणे शक्य आहे. त्यासाठी उद्योजकांना लागणाºया पाण्याची अडचण सुटणे नितांत आवश्यक असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय स्तरावरून शासनाकडे पाठपुरावा व्हायला हवा, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title: Industry in Washim MIDC in danger due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.