मानोरा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:45 IST2021-08-19T04:45:01+5:302021-08-19T04:45:01+5:30

स्व. मधुकररावजी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जिजामाता बालगृहात धामणीचे पोलीस पाटील मनीष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ...

Independence Day festivities in Manora taluka | मानोरा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

मानोरा तालुक्यात स्वातंत्र्य दिन उत्साहात

स्व. मधुकररावजी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जिजामाता बालगृहात धामणीचे पोलीस पाटील मनीष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थाचालक श्रीधर ठाकरे, राजू ठाकरे, संदेश डेरे, महेंद्र भगत, सोहम गावंडे, सुभाष पवणे, श्रेयस ठाकरे, गोपाल वायले उपस्थित होते.

........

पंचायत समिती

मानोरा येथील पंचायत समितीमध्ये सभापती सागरताई प्रकाश जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

............

माधवराव पाटील विद्यालय

कार्ली येथे शाळा समितीचे सदस्य विजय बालाजी गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उपेंद्र पाटील, शिक्षक माणिक डेरे, किशोर जाधव, योगेश गहुले, निरंजन उपाधे, पवनकुमार पाटील, निखिल गावंडे, सुनील अगलदरे, कर्मचारी रवी पाटील, अजय लवटे, संतोष पखमोडे उपस्थित होते.

Web Title: Independence Day festivities in Manora taluka