नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:43+5:302021-09-24T04:48:43+5:30

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नती त्वरित भराव्यात आणि इतर मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून २१ ...

Indefinite strike of registration and stamp department employees | नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नती त्वरित भराव्यात आणि इतर मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून २१ सप्टेंबरपासून संपास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्या ज्येष्ठता याद्या त्वरित निकाली काढणे, विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा, विभागीय चौकशीची कार्यवाही विहित मुदतीत पार पाडावी, नवीन आकृतिबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे कायम ठेवावेत, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरावीत, खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घ्यावी, बदल्या करताना संघटनेस विचारात घ्यावे, आदी मागण्यांचा संपात समावेश आहे.

००००००००००००००

सुमारे १९०० सदस्य या संपामध्ये सहभागी

नोंदणी व मुद्रांक राजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना ‘गट क’चे सुमारे १९०० सदस्य या संपामध्ये सहभागी झाले आहेत. याला राजपत्रित अधिकारी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी रात्री आपला पाठिंबा जाहीर केला आहे. संप आणि पितृपंधरवड्यास प्रारंभ यामुळे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश निबंधक कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

०००००००००००००००००००

२१ मागण्यांवर संघटना ठाम

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील प्रलंबित पदोन्नत्या त्वरित कराव्यात. विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत. कोविडमुळे मयत झालेले विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाखांची मदत मिळावी व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर विभागात नोकरीत सामावून घ्यावे. यासह २१ मागण्यांवर संघटना ठाम आहे.

००००००००००

कोट : २१ सप्टेंबरपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वर्ग ३ चे पदाधिकारी मुंबई येथे गेले आहेत. तेथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. बुधवारी त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाऊन तोडगा निघण्याची आशा आहे. वर्ग १, २ व सेवक वर्ग संपावर नाहीत.

- सागर पवार, अराजपत्रित कर्मचारी संघटना, वाशिम जिल्हाध्यक्ष.

Web Title: Indefinite strike of registration and stamp department employees