भारनियमनामुळे आजारात वाढ
By Admin | Updated: May 20, 2014 22:45 IST2014-05-20T22:13:50+5:302014-05-20T22:45:32+5:30
भारनियमनाच्या नावावर ग्रामीण भागात १२ ते १४ तास विद्यूत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे बालकासह नागरिकात रोगराईला उधाण आले आहे.

भारनियमनामुळे आजारात वाढ
मानोरा : भारनियमनाच्या नावावर ग्रामीण भागात १२ ते १४ तास विद्यूत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तसेच रात्री १२ वाजताच्या दरम्यान भारनियमनाच्या नावावर विद्यूत पुरवठा खंडित राहत असल्याने अनेक रोगांना आमंत्रण मिळत असून डास, मच्छर यामुळे बालकासह नागरिकात रोगराईला उधाण आले आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घेण्याची पाळी आलेली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात भारनियमनाव्यतिरिक्त विद्यूत पुरवठा खंडित राहत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. याला जबाबदार ज्या त्या चार ते पाच गावासाठी नियूक्त केलेले विद्यूत सेवक मुख्यालयी हजर राहत नसल्याने रात्री बेरात्री अवेळी विद्युत पुरवठा खंडित होतो. तेव्हा रात्रीच्या दरम्यान खाजगी गावातील व्यक्तीने विद्यूत पुरवठा सुरळीत केला तर ठिक नाही तर रात्र काळोख्यात काढण्याची पाळी नागरिकावर येते. महावितरणच्या हेकेखोर पद्धतीमुळे जनता कंटाळली असून होणार्या गैरसोयीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिवसाही भारनियमन व रात्री ८ ते १२ वाजताच्या दरम्यान भारनियमन करण्यात येत असल्याने अनेक विद्यूत विषयक बाबीला नागरिकांना सामोरे जाण्याची पाळी आलेली आहे. त्यामुळे भारनियमनाचे वेळ बदलून रात्रीच्या दरम्यान करण्यात येणारे भारनियमन बंद करण्याची मागणी होत आहे.
मानोरा शहरासह ग्रामीण भागात वीज भारनियमन मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर कंदिल किंवा दिव्याचा वापर लोक करतात. त्याकरिता रॉकेल आवश्यक असताना वितरक दर महिन्याला रॉकेलचा पुरवठा कमी आला असे सांगून रॉकेलचा काळाबाजार करीत आहे.
रॉकेलचे भाव वाढल्यामुळे मानोरा व ग्रामीण भागातील रॉकेल माफियाकडून रॉकेलचा अवैध मार्गाने गैरवापर सुरू आहे. ट्रॅक्टर, ट्रक, मळणी यंत्र, जनरेटर आदी करिता रॉकेलचा वापर वाढला आहे. जादा दराने रॉकेल विकल्या जात असल्यामुळे ग्राहकांना रॉकेल दुकानदार वेठीस धरून आपल्याकडील राशनकार्ड आणण्याचे सांगतात.
अनेक नागरिकांचे नाव समाविष्ट आहे मात्र राशनकार्ड हरविल्यामुळे तसेच काही नागरिक कामाच्या शोधात इतरत्र गेल्यावर सुद्धा त्यांचे नावाने आलेले रॉकेल काळ्या बाजारात चढय़ा भावाने विक्री केल्या जात आहे.