वाशिम जिल्ह्यात गौण खनिज चोरींच्या घटनेत वाढ

By Admin | Updated: December 28, 2014 01:26 IST2014-12-28T01:26:13+5:302014-12-28T01:26:13+5:30

कारंजा,वाशिम व रिसोड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात चोरी.

Increase in the incidence of minor minerals in Washim district | वाशिम जिल्ह्यात गौण खनिज चोरींच्या घटनेत वाढ

वाशिम जिल्ह्यात गौण खनिज चोरींच्या घटनेत वाढ

वाशिम : जिल्हय़ात रेती, मुरूम, गिट्टी आदी गौण खनिजाची अवैध वाहतूक करण्याच्या घटनेमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. संबंधितांच्या कारवाया मोठय़ा प्रमाणात सुरू असतानाही वाळू तस्करीसह गौण खनिजाची चोरी मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या गत ८ दिवसातील कारवायांवरून दिसून येते. महसूल विभागाच्यावतिने अवैध गौण खनिजाची चोरी करणार्‍यांवर धडक मोहीम राबविण्यात येत असून, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक गौण खनिज चोरी करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाया कारंजा तालुक्यात झाल्याचे दिसून येते. महसूल प्रशासनाने एप्रिल ते डिसेंबर आतापर्यंत जवळपास २४ लाख रूपयांचा महसूल अवैध गौण खनिज चोरीप्रकरणी शासन तिजोरीत जमा केला आहे. अद्यापपर्यंत वाळू लिलावांना हिरवा कंदील मिळाला नसल्याने वाळू लिलाव होऊ शकले नाहीत, त्यामुळे चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे. डिसेंबर महिन्यात ढिल्ली या गावाजळ एम.एच. ३७ जे. ९७२ क्रमांकाचे वाहन गिट्टी घेऊन जात असताना वाशिमचे तहसीलदार आशीष बिजवल यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नीलेश मडके, विजय खेडकर यांनी ही कारवाई केली. गत दोन ते तीन दिवसांआधी ४ वाहनांवर यासंदर्भात कारवाई करून प्रत्येकी १0२00 रुपये दंड करण्यात आला; तसेच दोन वाहनांवर कारवाई करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आले होते. त्यानंतरही मोठय़ा प्रमाणात अवैध गौण खनिजाची चोरी मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील टाकळी खु. येथून सरकारी जागेतून गौण खनिज चोरीच्या प्रकारांना ऊत आला असल्याचे चित्र आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने पथक तयार करून गौण खनिजाची चोरी होत असल्याच्या गुप्त माहितीनुसार रात्री धाडी टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक कारवायाही झाल्या आहेत. ११ डिसेंबरच्या रात्री मुरूम १ ट्रॅक्टर व २ ट्रॅक्टर रेतीची अवैधरीत्या वाहतूक करताना पकडून त्यांच्याविरूद्ध आठ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. अवैध गौण खनिज चोरीप्रकरणी महसूल विभागाची मोहीम सुरू असून, मोठय़ा प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत व सुरू आहेत. डिसेंबर आतापर्यंत जवळपास २३ लाख रूपयांचा दंड वसूल करून शासन दरबारी जमा केला आहे; तसेच अनेक वाहनांवर कारवाईही करण्यात आली असल्याचे वाशिमचे तहसीलदार आशीष बिजवल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Increase in the incidence of minor minerals in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.