वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST2021-05-16T04:40:07+5:302021-05-16T04:40:07+5:30
................. स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाºयांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश ...

वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय
.................
स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय
वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाºयांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार हा भाड्याच्या इमारतीत सुरू असून आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
.............
खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीस ‘खो’
जऊळका रेल्वे : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरुन यासंबधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक देखील दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.
......................
अतिक्रमणाने गायरान जमिन धोक्यात
मेडशी : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शे. रऊफ यांनी शुक्रवारी केली.
...............
मालेगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव
मालेगाव : येथील तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकात विविध समस्या उद्भवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसस्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सुरेश कोकाटे यांनी निवेदनाव्दारे केली.
.......................
एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : शहर परिसरातील एटीएम अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारीदेखिल असाच अनुभव अनेक नागरिकांना आला.
......................
वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी
किन्हीराजा : बहुतांश जीप, आॅटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदुषणाची समस्या दुर करावी, अशी मागणी प्रविण गोटे यांनी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली.
.................
ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन
वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत बहुतांश ग्रामसेवक अपडाऊन करित असून कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशीत करण्याची मागणी गौतम गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडे केली.
...................
कोंडवाड्याची दुरूस्ती करण्याची मागणी
शिरपूर जैन : येथील बसस्थानकाला लागून असलेल्या गुरांच्या कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून त्यात गुरे कोंडली जात नाहीत. या कोंडवाड्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
................
लोखंडी बॅरिकेट्समुळे अपघाताची शक्यता
वाशिम : शहरातील पाटणी चाैक, रिसोड नाका व पाटणी काॅम्प्लेक्ससमोर रस्त्याच्या मधोमध लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
..............
मान्सूनपुर्व कामांना वेग
वाशिम : स्थानिक महावितरण कार्यालयाकडून मान्सूनपुर्व कामांना वेग देण्यात आला आहे. याअंतर्गत विद्युत तारांच्या मध्ये येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे युद्धस्तरावर सुरू आहे.
...............
बंदीच्या काळातही रेतीची वाहतूक
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने कडेकोट बंद आहेत. दुसरीकडे मात्र अवैध रेती वाहतूक राजरोस सुरू असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
............
उड्डाणपुलाचे काम ठप्प
वाशिम : शहरातून मंगरूळपीरकडे जाणाऱ्या मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम केले जात आहे; मात्र गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सध्या तर सदर काम ठप्प असल्याचे दिसत आहे.