कारंजा तालुक्यातील घरकुलांची कामे अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:24 IST2021-02-05T09:24:23+5:302021-02-05T09:24:23+5:30
................. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे ...

कारंजा तालुक्यातील घरकुलांची कामे अपूर्ण
.................
गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण
वाशिम : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश दिले असून, हे काम सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विजय साळवे यांनी दिली.
..................
रेतीअभावी रखडली शौचालयाची कामे
वाशिम : जिल्ह्यात तीन हजार शौचालयाचे बांधकाम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले होते, मात्र रेतीच उपलब्ध नसल्याने बहुतांश कामे रखडली आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी लाभार्थींमधून होत आहे.
.................
वाशिममध्ये बुधवारी आरोग्य शिबिर
वाशिम : स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डोळे, कान, घशाचे आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले.