सराफा दुकानामध्ये आयकर विभागाची झाडाझडती

By Admin | Updated: December 11, 2015 02:53 IST2015-12-11T02:53:44+5:302015-12-11T02:53:44+5:30

अकोल्यातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ.

Income tax department's tree plantation in the bullion shop | सराफा दुकानामध्ये आयकर विभागाची झाडाझडती

सराफा दुकानामध्ये आयकर विभागाची झाडाझडती

अकोला: शहरातील गांधी रोडवरील एका सराफा दुकानामध्ये गुरुवारी आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. शहरातील गांधी रोड परिसरातील एका सराफा दुकानामध्ये आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी आकस्मिक भेट दिली आणि सराफा दुकानातील खरेदी-विक्री व्यवहारासंबंधीचे कागदपत्रे व इतर दस्तऐवजांची तपासणी केली. खामगाव येथे सराफा दुकानांची तपासणी केल्यानंतर आयकर विभागाने अकोल्यात सराफा व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका सराफा दुकानामध्ये आयकर अधिकारी महाजन, चौबे यांच्या पथकाने तपासणी केल्याने, सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आयकर अधिकार्‍यांकडून सराफा दुकानातील कागदपत्रांसह आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत होती. परंतु, आयकर अधिकार्‍यांच्या तपासणीतून काय निष्पन्न झाले, याची माहिती प्राप्त होऊ शकली नाही.

Web Title: Income tax department's tree plantation in the bullion shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.