शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:27 PM

Washim News सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे सुलभ होणार आहे.

 वाशिम : ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत ‘ड्रोनद्वारे’ जिल्ह्यातील ६४१ गावांतील गावठाणांचे सव्‍‌र्हेक्षण केले जाणार असून, संबंधित नागरिकांना जागेची मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) मिळणार आहे. मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करणे सुलभ होणार आहे.ग्रामीण भागातील गावठाणांमध्ये राहणाºया नागरिकांना त्यांच्या मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, तसेच त्याचा नकाशा व सीमा याविषयी माहिती नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून गावठाणातील जागाधारकांच्या जमिनीचे मोजमाप करून त्याचा मालकी हक्क अधिकृतपणे देण्यासाठी जिल्ह्यात स्वामित्व योजना राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत ड्रोनद्वारे जिल्ह्यातील ६४१ गावांमधील गावठाणांचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत.  या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक मिळकतीचे क्षेत्र, सीमा निश्चित होणार असल्याने ग्रामपंचायतींना कर आकारणी करताना मदत होणार आहे. जितके क्षेत्र, त्याप्रमाणातच कर भरावा लागणार आहे. सर्व मिळकती कराच्या व्याप्तीमध्ये येणार असल्याने ग्रामपंचायतींच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायतTaxकर