वाशिम जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी संततधार पाऊस
By Admin | Updated: July 24, 2014 02:08 IST2014-07-24T01:51:20+5:302014-07-24T02:08:30+5:30
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला : मानोरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद, जलाशयांची पातळीत वाढ.

वाशिम जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी संततधार पाऊस
वाशिम : यंदा मृग नक्षत्रापासूनच दडी मारून बसलेला पाऊस १0 जुलैपासून जिल्हावासींवर मेहेरबान झाला आहे. जून महिन्यापासून तर २२ जुलैच्या रात्रीपर्यंत जिल्ह्यात केवळ १२५२.१0 मिलीमीटर पाऊस झाला असून, यातील ४५८ मिलीमीटर पाऊस २२ जुलैच्या रात्री झाला आहे. हा पाऊस या पावसाळ्यातील आजवरचा सर्वाधिक आहे. सदर पावसामुळे जिल्ह्यातील नदी व नाले पहिल्यांदा वाहून निघाले असून, शेतकरीही सुखावले आहेत.
यंदा मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकर्यांनी पेरण्या उरकल्या होत्या; परंतु मृगात रिमझिम बसणार्या पावसाने त्यानंतर मात्र अचानक दडी मारली. परिणामी, जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ३७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या; मात्र २२ जुलैपासून सुरू झालेल्या पावसाने जिल्ह्यातील चित्र बदलायला सुरूवात झाली आहे. रखडेल्या पेरण्यांनी गती घेतली असून जलाशयातील पाणी साठय़ातही किचींतशी वाढ झाली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पातील साठा एका टक्क्याने वाढला आहे.