पोलीस पाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST2021-06-23T04:26:58+5:302021-06-23T04:26:58+5:30
व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब वाशिम : सध्या वाशिम येथील बाजारपेठेतील व्यवहारातून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे दिसत ...

पोलीस पाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा !
व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब
वाशिम : सध्या वाशिम येथील बाजारपेठेतील व्यवहारातून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला होता. आजच्या घडीला व्यवहारामध्ये दाेन हजार रुपयांच्या नाेटा दिसून येत नाहीत.
छोट्या मालवाहू वाहनातून जडवाहतूक
वाशिम : छोट्या स्वरूपातील मालवाहू वाहनांच्या टपावर गज, स्प्रिंकलर ईप, अँगल अशा जड वस्तूंची वाहतूक केली जात असल्याचे चित्र वाशिम शहरात दिसून येते. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामसेवकांचे अपडाऊन
वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावपातळीवरील कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशित करण्याची मागणी गौतम गायकवाड यांनी केली.