शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:47 AM2017-10-18T01:47:49+5:302017-10-18T01:48:09+5:30

वाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्या

Improved application for teachers | शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

Next
ठळक मुद्देअवर सचिवाचे पत्रजिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रि येत बदल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्यामुळे या बदली प्रक्रियेंतर्गत नव्याने अर्ज मागविण्यात येत  आहेत. यासाठी केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या  राऊंडमध्ये अर्ज करणार्‍या शिक्षकांना  सुधारित अर्ज करावे  लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी १३ ऑ क्टोबर रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात हे स्पष्टपणे सूचित केले  आहे. 
राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने  शासनाच्या २७ फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद  शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी नवे धोरण तयार केले  आहे; परंतु न्यायालयीन प्रकरणांमुळे या प्रक्रियेला विलंब होत  गेल्याने शासनाने यंदा कमीतकमी बदल्या होण्याच्या अनुषंगाने  १२ सप्टेंबर २0१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन संगणकीय  बदली प्रणालीद्वारे विशेष संवर्ग भाग १, २, तसेच बदली  अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदलीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक  शिक्षकांकडून बदली अर्ज भरून घेतले आहेत. उपरोक्त  संवर्गा तील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विस्थापित होणार्‍या शिक्षकांकडून  अर्ज भरून घेण्यासाठी चौथी फेरीही सुरू करण्यात आली; परंतु  शासनाने या संदर्भात १२ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊन अंशत:  सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी  न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील  सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २0१७  च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश  दिले.
 न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच  २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली  धोरणानुसार शिक्षकांकडून नव्याने अर्ज मागविणे आवश्यक  असल्याने केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत  बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत  अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी २७  फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी  सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध  करून देण्यात आले असून, हे अर्ज २३ ऑक्टोबर २0१७ पर्यंत  उपलब्ध राहणार आहेत. या बदली प्रक्रियेंतर्गत संबंधित  शिक्षकांना तात्काळ अर्ज करावे लागणार असून, आपला पसं तीक्रमही दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

शासनाच्या सुचनेनुसार व न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून  जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार  शिक्षकांना सुधारित प्रक्रियेनुसार अर्ज करावे लागणार आहेत.      - अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)

Web Title: Improved application for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक