तहसिलच्या पथकाचे दोन हॉटेलवर छापे

By Admin | Updated: May 14, 2014 00:28 IST2014-05-14T00:15:54+5:302014-05-14T00:28:10+5:30

दोन हॉटेलवर तहसिल प्रशासनाच्या पथकांनी छापा मारून चार घरगुती वापराचे सिलिंडर व इतर साहित्य जप्त केले आहे.

Impressions of Tahsil's hotel in two hotels | तहसिलच्या पथकाचे दोन हॉटेलवर छापे

तहसिलच्या पथकाचे दोन हॉटेलवर छापे

वाशिम : स्थानिक अकोला मार्गावर असलेल्या दोन हॉटेलवर तहसिल प्रशासनाच्या पथकांनी छापा मारून चार घरगुती वापराचे सिलिंडर व इतर साहित्य जप्त केले आहे. नायब तहसिलदार निलेश मडके यांच्यापथकाने ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार तहसिल प्रशासनाने आज घरगुती गॅस सिलिंडरचा होणारा दुरूपयोग रोखण्यासाठी शहरातील हॉटेल व महामार्गालगतच्या धाब्यांची झाडाझडती मोहीम राबविली. यावेळी अकोला मार्गावर असलेल्या आनंद भोजनालयात या पथकाला तिन घरगुती सिलिंडरचा दुरूपयोग होत असल्याचे आढळले. पथकाने सदर तिन्ही सिलिंडर जप्त केले. याच मार्गावर असलेल्या नरसिंहा हॉटेलमध्येही एका घरगुती सिलिंडरचा दुरूपयोग होत अससल्याचे निदर्शनास आल्यामुळे पथकाने तेथील सिलिंडर व इतर साहित्य जप्त केले. तहसिलदार आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.

Web Title: Impressions of Tahsil's hotel in two hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.