शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीररित्या झाडे ताेडली; कंत्राटदार कंपनीला ३३ हजार रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 12:59 IST

Illegally felled trees एक सागवान वृक्ष मुळासकट पाडून आणि इतर सत्तेचाळीस झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याप्रकरणी ३३ हजार रुपये दंड करण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्कमानाेरा : तालुक्यातील वाईगौळ येथील शेतकरी ध्रुव परसराम राठोड यांच्या शेतातील मानोरा दिग्रस या निर्माणाधीन महामार्गाच्या बांधकाम दरम्यान बांधकाम कंत्राटदार कंपनीने बेकायदेशीररित्या पोकलॅण्ड मशीनने एक सागवान वृक्ष मुळासकट पाडून आणि इतर सत्तेचाळीस झाडांना मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याप्रकरणी ३३ हजार रुपये दंड करण्यात आला. राठाेड यांनी यासंदर्भात तक्रार  वन विभागाकडे केली होती. शेतकरी ध्रुव परसराम राठोड यांच्या मालकीचे ६६१ गट नं. मधील शेताच्या धुऱ्यावर यांनी मोठ्या प्रमाणात सागवान  झाडाची लागवड केली हाेती. या सागवान झाडाची मोठ्या प्रमाणात नासधूस आर. एन. एस. इन्फ्रा. कं. लि. हुबळी यांच्या पोकलॅण्डद्वारा काम करीत असताना करण्यात आल्याची तक्रार शेतकरी राठोड यांनी मागील वर्षाच्या सातव्या महिन्यात वनविभागाकडे केली हाेती . शेतकरी ध्रुव राठोड यांच्या तक्रारीवरून बांधकाम कंपनीद्वारा राठोड यांच्या शेतातील खोदकामामुळे एक सागवनाचे झाड पूर्णपणे जमिनीवर पडले असून इतर ३८ झाडांचे नुकसान झाल्याचा पंचनामा वन प्रशासनाकडून करण्यात आला. वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांनी क्षेत्र सहाय्यक मानोरा यांनी गैर अर्जदार यांचे समक्ष शेतकरी राठोड यांच्या शेताचा मोकास्थळ पंचनामा व त्या अनुषंगाने या कार्यालयाला सादर केलेला अहवाल या सर्व बाबी ग्राह्य धरून कंत्राटदार कंपनीला सागवान प्रजातीची एकूण ३३ झाडे व इतर प्रजातीची एकूण सहा झाडांचे नुकसान केल्यामुळे  तेहतीस हजार रुपये एवढा दंड आर. एन. एस. इन्फ्रा. या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करणाऱ्या कंपनी प्रशासनाला केला आहे.  कुठल्याही प्रकारचे वैध कागदपत्रे कंपनी   प्रशासनाकडे नसतानाही जबरदस्तीने माझ्या शेतीचे खोदकाम करून   मोठ्या कष्टाने लावून संगोपन केलेल्या मौल्यवान सागवनाच्या झाडांची तोड आणि नासधूस     करून माझे मोठे आर्थिक नुकसान  या महामार्ग बांधकाम कंपनीने केले आहे. - ध्रुव परसराम राठोड बाधित शेतकरी ,वाईगौळ

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा