अवैध दारू साठा पकडला!
By Admin | Updated: June 15, 2017 01:51 IST2017-06-15T01:51:53+5:302017-06-15T01:51:53+5:30
मानोरा : शहरातील हॉटेल दि बॉसच्या मागे १४ जून रोजी अवैध देशी दारू विक्री होत असताना पोलिसांनी पकडली.

अवैध दारू साठा पकडला!
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : शहरातील हॉटेल दि बॉसच्या मागे १४ जून रोजी अवैध देशी दारू विक्री होत असताना पोलिसांनी पकडली. विपुल दयाराम राठोड रा. माहुली याच्या जवळून १०८ देशी दारूच्या शिश्या किमत २८०० रुपये पीएसआय राहुल काटकाडे यांनी टाकलेल्या धाडीत पकडले. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धाड टाकली. प्रकरणी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास पीएसआय राहुल काटकाडे करीत आहेत. शहरात इतर ठिकाणीही बेकायदा दारू विक्री होत असून, पोलिसांनी लक्ष घालावे.