शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

खासगी डॉक्टरकडून २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 19:26 IST

Washim News : रुग्ण कल्याण समितीने २४ मे रोजी कारंजा येथील एका खासगी डॉक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला.

कारंजा लाड : औषधीचा अवैध पद्धतीने साठा ठेवणे तसेच संशयास्पद वैद्यकीय पदवीप्रकरणी रुग्ण कल्याण समितीने २४ मे रोजी कारंजा येथील एका खासगी डॉक्टराच्या दवाखान्यात छापा टाकला. यावेळी २५ लाखांचा अवैध औषधी साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.कोरोनाकाळात कोविड रुग्णालयाची परवानगी नसतानाही काही जण रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने शोध मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. कारंजा येथील शोएब एम.खान सिद्दीकी यांचे रौशन क्लिनिक, गवळीपूरा येथे रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी कालिदास तापी, तालुका वैद्यकीय अधिकारी किरण जाधव, वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने, डॉ. किरण वाघमारे, नायब तहसीलदार विलास जाधव यांच्यासह चमूतील सदस्य व पोलीस कर्मचाºयांनी पाहणी केली असता, दोन रुग्णांना सलाईन सुरू असल्याचे दिसून आले. पदवीबाबत विचारणा केली असता, खात्रीदायक पदवी आढळून आली नाही तसेच त्यानंतर कोणतेही नूतनीकरण न केलेले प्रमाणपत्र दाखविले नाही. यामुळे रुग्णांना भरती करण्याचा, अ‍ॅलोपॅथिक औषधी देण्याचा, औषधाचा साठा करण्याचा अधिकार नसताना गैरकायदेशीरपणे कामकाज केल्याचे आढळून आले. काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले. यावेळी स्टेरॉईड, झोपेच्या व गुंगी आणणाºया गोळ्या, सलाईन यासह अन्य औषधीसाठा आढळून आला. यासंदर्भात तहसीलदार धिरज मांजरे व पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांना माहिती देताच, त्यांनी घटनास्थळ गाठून उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांना माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन अधिकारी मेतक यांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या. २५ लाख किंमतीचा औषधीसाठा जप्त केला असून, रुग्ण कल्याण समिती व अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून पुढील कार्यवाही केली जात आहे.

टॅग्स :Karanjaकारंजाwashimवाशिमdoctorडॉक्टर