शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या शूटिंगसाठी विनापरवानगी ड्रोन वापरणार असाल तर सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 12:20 IST

Washim News : आता छोट्या शहरांमध्येही ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंगची ‘क्रेझ’ वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम लग्न समारंभाची शूटिंग ड्राेनव्दारे करायची असेल तर ड्राेनचे लायसन्स व उडविण्याची स्थानिक पाेलिसांकडून परवानगी आवश्यक आहे. अन्यथा आपल्यावर कारवाई हाेऊ शकते, अशी माहिती पाेलीस विभागाकडून देण्यात आली आहे.महानगरांनंतर आता छोट्या शहरांमध्येही ड्राेनव्दारे फाेटाे, शूटिंगची ‘क्रेझ’ वाढत आहे. यापूर्वी केवळ उच्चभ्रू लोकांकडूनच पसंती दिली जात होती. आता अनेक ठिकाणी याचा वापर केला जाताेय. वाशिम शहरामध्येही तीन व्यावसायिकांकडे ड्राेन उपलब्ध आहेत. पूर्वी नजीकच्या अकाेला, अमरावती जिल्ह्यातून आणून लग्नात यापूर्वी ड्राेनव्दारे शूटिंग करण्यात येत हाेती. परंतु ग्राहकच नसल्याने ड्राेन अडगळीत पडले आहेत

ड्रोन उडवण्यासाठी नियम आणि कायदे

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या नियमानुसार ड्रोन  विक्री आणि उडवण्याबाबत नियम  आणि कायदे निश्चित केले आहे.  वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी मिळते. काेणत्याही कार्यात ड्राेन उडवायचे असल्यास स्थानिक पाेलीस प्रशासनास सांगणे गरजेचे.

व्यावसायिक किंवा करमणुकीच्या उद्देशाने २५० ग्रॅम ते २५ किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या ड्रोन उड्डाणासाठी परवाना आवश्यक असणे आवश्यक आहे. मर्यादित उंची आणि क्षेत्रामध्ये ड्रोन उडवण्यास परवानगी दिली जाते; मात्र ड्रोनद्वारे कोणतीही धोकादायक वस्तू वाहून नेण्यास मनाई आहे.पोलिस परवानगीशिवाय ड्रोन उडवता येत नाही. त्यासाठी रीतसर स्थानिक पोलिसांना अर्ज करावा लागतो.  संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती, कोणत्या कारणासाठी ड्रोन उडवणार आहे, किती कालावधीसाठी याची माहिती घेतल्या जाते.नॅनो श्रेणीतील ड्रोन वगळता वैध परवाना किंवा परवानगीशिवाय ड्रोन उडवणाऱ्यास दंड हाेऊ शकताे.  नाे फ्लाईंग झाेन असल्यास ड्राेन उडविता  येत नाही.

कोणताही लहान ड्रोन १२० मीटर उंचीपेक्षा अधिक आणि कमाल २५ मीटर प्रतिसेकंद वेगापेक्षा अधिक वेगाने उड्डाण करण्यास मनाई.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस