जलसंधारणाची विकास कामे झाल्यास गाव समुध्द होईल
By Admin | Updated: February 28, 2015 00:50 IST2015-02-28T00:50:36+5:302015-02-28T00:50:36+5:30
कारंजा तालुक्यात ग्रामगीता संत्सग प्रवचनातून गावक-यांना मार्गदर्शन.

जलसंधारणाची विकास कामे झाल्यास गाव समुध्द होईल
कारंजा लाड (वाशिम): गाव विकासाबरोबर शेती विकासाची कामे झाल्यास गाव समुध्द होइल त्याकरीता गावकयांनी आदर्श गाव योजनेत लोकसहभागाने पुढाकार घेउन गावात जलसंधारणाची विकास कामे करावी. त्यामुळे गाव समुध्द होईल असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक ह.भ.प रामधन महाराज यांनी केले. येथे २३ फेब्रुवारीला ग्रामगीता संत्सग कार्यक्रमात गावकर्यांना मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती कृषी विभाग पुणे यांच्या वतीने निवड झालेल्या वाशिम जिल्हय़ातील धोत्रा जहॉगीर येथे जलसंधारणाच्या कामांबरोबर गाव विकास कामात गावकर्यांनीही सहभागी व्हावे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्दशाने येथे ग्रामगीता सत्संग कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलतांना रामधन महाराज ग्रामगीतेचे प्रमाण देत म्हणाले की, गाव हा विश्वाचा नकाशा गावावरूनी देश्याची परीक्षा गावची भंगता अवदसा येईल देशा या प्रमाणे गावाचा विकास झाल्यास देशाचा विकास शक्य आहे. गाव समुध्द करण्याची संधी या योजनेच्या माध्यमातुन गावकर्यांना मिळाली आहे. त्या दुष्टीने गाभा व बिगर गाभाची कामे होणार आहे. यातुनच गावातील जलपातळी वाढवून श्रमता वाढवून गावातील सिंचन श्रेत्रात वाढ होईल याकरीता शासन स्तराहुन निधी उपलब्द होणार आहे. पण तो निधी आपला समजुन त्या करीता लोकसभाग दिल्यास काम दर्जदार होउन गावात एकीच्या बळाने गाव प्रगती पथावर जाईल याकरीता गावकर्यांनी सहभाग दयाव असे आवाहन रामधन महाराज यांनी केले.